Saturday, June 9, 2012

My Words ( Poetic Feelings)


!!!!मृत्य !!!!

फक्त चार खांदेच सोबत येतात

तेही काहीसे परिचयाचे -अपरीचायाचे ,
या घडीला तेच हवेत
मृतुला भेटायाचेय
मरताच मृत्यूला जिंकायचं
काहीही अभद्र घडण्या पहिलेच
आपले जीवन संपावनेच योग्य
येणाऱ्या प्रत्येक अनपेक्षित स्थित्त्यान्तारांना
पाहताच टाळणंच रास्त
अस्थिरता अनिश्चितता अशांतता याला एकच औषध
मृत्यू ,मृत्यू आणि मृत्यू
मला तो हवा फक्त  .....
माझ्या आप्तांच्या पहिले
काही अभद्र घडण्या पहिले.
-----------------------------







!!!! आशा  !!!

एकच आशा मनी मनीषा

करेल का कधी पूर्ण कोणी ?
माझ्या विधात्या मधली दुरी सरेल का कधी तरी ?
या जन्मापासून सुरू हि कहाणी
सतत ये जा सुख- दु;खांची
कधी हसू , कधी अश्रू ,कधी नुस्त वाट पाहणी ,
कधीही मिळेल ,कधीही हरपेल
आपलीच वस्तू आपल्याच हातून
खेळ कारणी हि सर्व त्याचीच .......
म्हणूनच म्हणतो .......
एकच आशा मनी मनीषा
करेल का कधी पूर्ण कोणी ?
एकच आशा मनी मनीषा
एक सरली तर्द दुसरी उभी
सीमा नसते तिला कधी ,वाट असते ती पूर्ण होण्याची
हीच या जीवनाची कर्म कहाणी .
बघताच तिला उमलली नवी आशा
कधीतरी ती होईल आपलीच आता
एकच आशा मनी मनीषा होती कधी ?
आता रोज नवी आशा नवी मनीषा ,
का कोणास ठाऊक काय तिच्यात
तीच आशा आता तीच मनीषा . 

-------------

!!!! माझे प्रेम !!!

लवती पापणी चेहऱ्यावरती

सांगते तुझी कहाणी
निशब्ध भावना धुंद गारवा
सांगता कडे सर्वांना !
श्यामल रंग सांझेसम ,पहाट दिसे चेहऱ्यावर
उजाळत फिरे दहुदिशा ,दिन असो कि निशा ,घेऊन अधरांवर स्मिता,
सोज्वळ रूप असे तुझे ,चांदनी तेज पसरविते
निरागस रातराणी सम ,सुगंध दरवळत चोहीकडे
परीसच तुझी संगत ,त्यास प्रीतीची सोबत
नैसर्गिक तू दर्पण , अंगी चंदनी समर्पण ,
नसे कुणी तुझसम, आहेस एकटी तूच या धरणीवर .
अग ...
माहित आहे तुला ....
स्वर्गातल्या अप्सरा मागतात भिक तुला.
परी-अप्सरेची हि कथा , तर नर-नारीची काय व्यथा ?
एव्हढं  सौंदर्य ,तुझ्यात एवढी नशा,
केलीस देव-दैवाची हि दशा.
म्हणूनच   .....
करतात सर्व तुझ्याच प्रीतीची आशा .
----------------------------------
________________________________________



!!! शाश्वत सत्य !!!

माझ्या स्वप्नाळू डोळ्यांनी एक शाश्वत सत्य बघितलं
नाजूक ओठांना गुलाबी गालांना एका सुंदर चेहऱ्यात लपलेलं बघितलं .
कधी नव्हे जे पहिले ते सौंदर्य अनुभवलं ,माझ्या स्वप्नाळू डोळ्यांनी
तुझ्या बहुक सौंदर्याने  हृदयाला हि माझ्या स्वप्नाळू बनवलं.
पहिल्याच नजरेत तू आपलासा केल, मला माझ्या पासूनच चोरून नेलं.
या पाषाण हृदयाला आपल्या प्रीतीने  गुळगुळीत केलंस.
चंदनी सोज्वळतेचा, कस्तुरी सुगंधाचा निरागस फुलांचा  शाश्वत  अनुभव  तुझ्या प्रीतीसौन्दार्याने झाला.




____________________



!!! एकांत !!!

मनातली आशा आज पूर्ण झाली
स्वप्नातली गोष्ट साक्षात घडली
तिची नि माझी आज एकांतात भेट झाली .
ती माझ्याकडे मी तिच्याकडे .काळीज माझे वेगाने धळंधळे,
औठांना तर कुलूपच लागले ,बोलण्याचे काम डोळ्यांनी केल .
या वेळेचा या संधीचा ,तिच्या माझ्या एकांताचा फायदा झाला
तिच्या स्पर्श्याने असा चमत्कार घडला ,लोखंडाचा केला तिने परीसच मला.
माझा मीच नव्हतो कधी ,झालो आता तिचाच मी ,
एकाच एकांताने घडली  किमया , सुदैवाने मिळाली तिच्या प्रीतीची छाया.

----------


!!! कारावास !!!

जन्मापासून कदाचित  मरेपर्यंत ,
माझे दुःखाशीच नात होत  आणि राहील
मी अश्रूच्या अशा सागरात पोहलो , ज्याला कधीच  सुखाची नदी येऊन मिळाली नाही .

बालपण तारुण्याच्या आशेवर गेले ,कदाचित म्हातारपण मृतुच्या .
निराशा असूया अनास्था अशांती ,
या तर दुखाच्या तुरुंगाच्या भिंती आहेत ,
यातच मी केलेल्या पापांची ;विधात्याने ,दैवाने लादलेली जन्मठेप भोगतोय.
मृत्यू हि मला भेटायला घाबरतो ....
म्हणतो इथे मला मज्जाव आहे ,कारण मी ( मृत्यू ) काळाच्या हाती बांधलेला आहे.
आह्या या तुरुंगात फक्त एकंच छिद्र आहे , त्यातून फक्त सुख दिसत , मी त्याला (सुखाला) दिसत नाही .
हेच या तुरुंगाचे वैशिष्ट आहे आणि माझी शोकांतिका .
माय्झा या जीवनाचा हा कारावास  मृतुपेक्षा भयंकर आहे ,
आणि तो मला एकट्यालाच भोगायचा आहे ,कारण दुसरा पर्याय नाही.

जगतोय याच आशेवर कि एक दिवस मृतू येईल आणि माझी सुटका करेल ,
पण तो हि माझे आमंत्रण स्वीकारत नाही आणि माझा हा कारावास संपत नाही .

--------------



!!! हेवा !!!
रंभा मेनाकेलाही व्हावा तुझ्या सौंदर्याचा हेवा ,
असा ऐश्वर्याचा खजिना आहे तुझ्यात लपला .
परी अप्सरा असतील गोष्टीत ,तू आहेस बघणाऱ्यांच्या दृष्टीत

साधी सरळ अधिकच गोंडस,
निर्मळ-निरागस आणि सालस.
श्यामल  रंगाची तू करामत ,घेऊन अवीट हास्याची सोबत.
कळी-कळी अन फुलाफुलात ,असेल नसेल ते आहे तुझ्यात ,
प्रीतीच्या या अबोल शिल्पात आज दिसतंय संपूर्ण ब्रह्मांड .


----------------



!!! अबोला !!!

नको बोलूस तू माझ्याशी , मीही नाही बोलणार तुझ्याशी ,
असलेल्या आपल्या प्रेमाला साम्पाव्ण्यापेक्षा रुसण्याचे सोंग परवडनार .
लोकांनी जवळ येऊन , आपण दूर जाऊन ,
सर्वांनी हसून तर आपण रुसून ,
नसतांनाही असलेले आणि असतानाही नसलेले प्रेम ,
आपण स्वतः लाच समजावून , हवं असून नको म्हणून व्यक्त करणार .

वेळ लागेल चालेल , पण प्रेमाला आपण लग्नातच बदलणार .
शेवटी कॅरीर ला आपल्या लग्नाच्या Achievement
चेच बक्षिश देणार.



------------------

!!! हृदयाची आग !!!

दुः नावाच्या या जीवनाला सुख नावाचे दुः पाहिजे
हसू नावाचे अश्रू डोळ्यातून औठांवर तरळले पाहिजे .
दुः खच्या या स्वर्गात मला ,सुखी नरक भोगायचंय
देव दैवापेक्षा यमालाच नवस करायचंय.
म्हणूनच जगतोय हसून मारतोय ,मरतांनाही जगण्याचा आनंद भोगतोय .

जा मझ्या आयुष्यातून ,नको लावूस जंग माझ्या काळजाला ,
एकदा साम्प्लोय आता उर्ण्याची इच्छा आहे .
प्रेम . प्रीती, प्रणय शब्धांची घृण येतंय .
का आवळ्तेस ? का तळपवतेस / संबंध नसतांनाही माझ्या मनात घर करतेस .
काय आहे तुझ्यात असं? मी जवळून दूर जातोय वळून परत तुझ्याच वाटेत येतोय ,
संपूनही उरतोय ,शेवटी तुझ्यातच संपतोय .


-------------------



!!!!! जळजळ  !!!!

किती दिवस घेऊन झोपू , मी उशीला जवळ ,
घे जवळ आणि संपवून टाक हि माझी जळजळ .
सागरात उठणारी प्रत्येक लाट , जशी पाहते पैलाताराची वाट ,
तही माझ्या काळजातल्या लाहीरीना तहान .
तू जवळ आली कि कासावीस होतो
, दूर गेली कि तळफळतो .
द्विधा स्थितीला काय मी एकटाच बळी पळतो.
किती छळंशील मला अजून, मी नाही फसणार तुला बघून  हो म्हण  आधी हसून ,
होकार प्रेमच औठावर घेऊन.
कळत कसा नाही तुला , मी आहे विवेकाने बांधलेला . जगाशी  सामर्थ्याने लढनारा
हरून जाईन तुझ्या नाकारला ,
हि आहे माझी व्यथा , नाही  अशी तुझी दशा, होकार दे आधी मला , मग वाहतो सर्वस्व तुला.
 

--------------

!!! प्रेम  तरंग  !!!
एकदा प्रेम कराव म्हणतो ?
प्रीतीच्या सागरात तरंगावा म्हणतो . पण ? पण ? विचार येतो.. तुला हे सांगावं कस ?
आपल्याच प्रेमाला व्यक्त कराव कस ?
तुझ्या माझ्या प्रीतीला  , आपल्या प्रणयाला शब्दात सांगावं कस?
तुही बघतेस मीही बघतो ,कधी चोरून तर लढी सरळ बघतो .
कधी दुरून तर कधी जवळून पाहतो .
आणि एकंच विचार करतो ... एकदा परम व्यक्त कराव म्हणतो .
नाही शब्दात तर पत्रात लिहाव म्हणतो .
प्रीतीच्या सागरात तरंगाव म्हणतो .
 

-------------


!!! आशेचा  अंत !!!
आशेचा  अंत निराशा असेल तर करायची कश्याला?
उगाच भावनावश होऊन रडायचा कश्याला ?
झालेल्या गोष्टींसाठी रडायचा कश्याला ?
उगाच चीन्तामय  होऊन झिजायचा  कश्याला ?

अश्रून बांध असता तर गोठवून टाकले असते डोळ्यात ,
दर्शवण्यासाठी वेदना दुः खाच्या  ?
वेदनांना वाचा असतीतर बोलून दाखवल्या असत्या दुः खाच्या कळा?
 

---------




!!! प्रेम कहाणी !!!
किती वेळ धरशील हा अबोला माझ्या शिवाय पर्याय नाही तुला
ये जवळ आणल्खीन माझ्या रुसवा फुगव सोडून आपला .
करतो प्रेम तुझ्यावर म्हणून रागावतो मी तुझ्यावर हसून .
रुसलेली तू दिसली जशी
दिसली नाही तू तशी कधी
म्हणूनच म्हणतो रुसत जा कधी कधी .
मला हसण्याची संधी देत जा कधी कधी .
रुसवा फुगव आवडे मजला , यातच जगण्याच गोडवा हसली- रुसली तरी माझीच ,
कारण तू मनातच ठसली हि आपली खरी कहाणी .

---------------


!!गुलाबी !!!

गुलाबी गालांवर कसला हा अबोला ?
माझ्या कालचं चुंबनाचा तर नाहीना परिणाम हा ?
कि आणखी हवा तुला प्रसाद प्रीतीचा , म्हणून तर धरला नाही ना अबोला?
आपली हि भाषा कडे औठांना, नाही गरज जिभेची याला ?
अशी श्वासांची हि अदलाबदल , वाढवते काळजाची धडधड .
अबोल होठ हसू देत तुझे . कळीचे फुल होऊ दे कसे ?
------------------



तू जशी मला दिसतेस तशी कोणाला दिसू नकोस ?
नाही तर प्रत्येक जन तुझ्या प्रेमात पडेल आणि माझ्या जीवाचे हाल होतील , म्हणूनच .....
तुझं  दिसणं, तुझं हसणं, तुझं  नटणं , तुझं  बोलण फक्त माझा आहे .
माझाच त्यावर हक्क असुदे ..नाहीतर माझा जीव घे  मला चालेल ..
पण एव्हढ्यावर माझा अधिकार राहू दे ....
तू सुंदर आहेस हे अबाधित सत्य आहे ..ते मला सोडून , इतरांना असत्यच वाटू दे .
कारण तू माझीच आहे , माझीच होणार आहेस , माझीच राहणार आहेस .
तू माझ्या जिवनाच  अर्थ आहेस . जगण्याचे कारण आहेस .
याचाच अर्थ माझे तुझ्यावर प्रेम आहे .
माझ भवितव्य तुझ्या माझ्या प्रीतीत आहे .
आणखी काय सांगू तू माझ वैभव आहेस .
मझ्या प्रीतीला सर्वस्वाला तुझाच आधार आहे .
______________



!!! दुः !!!

दुः दुः असत ?
जगण्याच मरण्याच एकंच असत ?
अश्रूंच्या सोबत येत . काळासोबत वाहून जात.
दुः विरहाच हि असत ते एकट्यानेच सोसायचं असत
जमल तर  रडायचं असत ,पण एकट्यानेच भोगायचं असत .
दुः दुः असत एवढंच मात्र खंर असत , ते  हसत लपवायचं असत .
दुः आपलं आपलंच असत .तेच फक्त मरेपर्यंत सोबत असत .
-------------



!!! वाट !!!
कधी होईल माझ्या आयुष्याची पहाट
सारून दुर्दैवाचा अंधार , घेऊन सुदैवाची वाट .
वाट वाट आहे सुखांची आयुष्याच्या पूर्णतेची ..पण व्यर्थ ....
वाट वाट असते ..
एक संपल्यावर दुसरी असते .
ती संपते जिथे दहन घाट असते .
असाच का जीवनाचा पात असतो ,
जन्मातांना थाट असतो , मारतांना घाट दिसतो .

जीवनात अशी एक वाट होती ,
जिथे तिची मला साथ होती ,पूर्निमेची रात्र होती ,
प्रणयाची बात होती ..अर्थात ती प्रीतीची वाट होती
पण व्यर्थ ...
जवळच विरहाची वाट होती ,
माझ्या एकट्याची पाऊलवाट होती .
फक्त एवढ्यासाठीच तिची माझी साथ होती .
या वाटेवरच मी जीवन जगतोय ,
कधी संपले याची वाट बघतोय .
का कुणास ठाऊक मी जगतो कशासाठी , कि याच प्रश्नाच्या उत्तरासाठी ?
अशी वाट वाट असते , कधी अमाव्स्याची तर कधी पौर्णिमेची रात्र असते .

-------------------



!!! चाल ना......!!!! 

चाल ना...... 
तू चाल माझ्या सोबत क्षितीजापलीकडे घरटे  आपले बंधू
भावनानच्या खिडक्या घेऊन , हृदयाचे दार लावू.
असे आपले घरकुल उभारू...
तू चल माझ्या सोबत , अबोल भावनांना आकार देऊ .
स्वप्नांना साकार करू , एकमेकांना आधार देऊ ,
चुम्बानांची भाषा बोलू , प्रीतीची बाग फुलवू .
असे आपले घरकुल उभारू .

रविकिरणांची ऊब घेऊ ,सुखाच्या सावलीत विश्रांती घेऊ .
पूर्निमेच्या चांदण्यात स्वतःला न्हाहू घालू .

तू चाल माझ्या सोबत क्षितीजापलीकडे घरकुल  उभारू ...
येतेस ना ................!

--------------




!!! रूप !!!

रूप तुझे वर्णन करतांना,  थिटे पाळतात शब्ध ,
तुला बघतच माझे काळीज झाले स्तब्ध !
काय सांगू , कसे वर्णनु ? तुझ्या रूपाचे मी रहस्य .
पण नको .. राहू दे.
शब्दःच शब्धांशी भांडतील , मी सांगतो मी वर्णितो म्हणतील?
तुझ्या स्मितहास्याने केले , अथांग समुद्राला आव्हान ,
आहोटीला आणले भरतीचे उथान,
हंस ! , पण नको घेऊ लोकांचे प्राण .

दुःख जगण्याचे मारण्याचे आहे समान
आज पहाट तर उद्या अंधार .
नाही सवळ, नाही काळ वेळेचे भान .
पण तुझ्या स्मितहास्याने केला सावरगा सुखाचा आभास .
हंस ! , पण नको घेऊ लोकांचे प्राण .

------------------



!! दोन ओळी  !!
अबाधित रहू दे तुझे हास्य दरवडूदे तुझा सुगंध ,
जसा कस्तुरीचा गंध करितो बेधुन्ध ,तू करतेस मला दंग .

तू तू आणि तू  , संर्वंगत तूच आहेस ,,
मी, मी नसून तू आहेस , हीच माझी स्थिती  आहे .


अथांग निळ्या जालाशायासम ,उठतात तरंग माझ्या हि मनी ,
कधी पोहचेल मी तीरावर, कि विरून जाईन मी काठावर .

No comments:

Post a Comment